Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

काथरगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३५०० आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ६ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, कापूस व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

काथरगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रसलपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशन स्पर्धेत रसलपूरला विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ९ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

काथरगाव गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

काथरगाव हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ६९२.४९ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ५३४ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २९८३ आहे. त्यामध्ये १५३९ पुरुष व १४४४ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या २ किमी अंतरावर गोदावरी नदी असून  गावातून कडवा पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे, उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

काथरगाव ता. निफाड, जि. नाशिक   गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

काथरगाव   गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

काथरगावच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

वर्ग संख्या
पुरुष 1015
स्त्रिया 914
एकूण 1929

संस्कृती व परंपरा

काथरगाव गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

काथरगावच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत मारुती मंदिर, खंडेराव महाराज मंदिर, महादेव मंदिर तसेच शिवाजी महाराज पुतळा  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती क्षेत्र व द्राक्षबागा – रामनगर (बेरवाडी) उस, कांदा, सोयाबिन, गहू  उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, कांदा  आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

काथरगाव गाव निफाड तालुक्यातील असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे रसलपूरशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

निफाड, कोठुरे, जळगाव, कुरडगाव, सुंदरपूर, पिंपळस, कुंडेवाडी ही काथरगावच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.क्र ग्रामपंचायतीचे नाव सभासदाचे नाव पद जन्म तारीख वय लिंग प्रवर्ग मोबाईल नं
काथरगांव सौ. वाघ रत्नाबाई जगन्नाथ सरपंच ०१/०१/१९६८ ५५ स्त्री सर्वसाधारण ९४२२९४२९३१
काथरगांव श्री. आंबेकर निळकंठ सुरेश उपसरपंच ०१/०६/१९८९ ३२ पुरुष अनुसुचित जमाती ९७६६९७६५२३
काथरगांव सौ. शशीकला बळवंत साळवे सदस्य ०१/०६/१९७० ५० स्त्री अनुसुचित जाती ९०११५०२०१५
काथरगांव श्री. केदार प्रशांत विलास सदस्य ३०/०५/१९८५ ४० पुरुष सर्वसाधारण ९४२२९५००२९
काथरगांव श्री. शिदे भाउसाहेब रमेश सदस्य १८/०९/१९८२ ४० पुरुष ना.मा.प्र ९७६६३८७०६३
काथरगांव सौ. वाघ धनश्री भगवान सदस्य ०२/०६/१९८६ ३० स्त्री अनुसुचित जाती ९०२२९८००४७
काथरगांव श्री. वाघ किशोर दत्तात्रय सदस्य ०८/०३/१९९१ ३० पुरुष सर्वसाधारण ८८०५७४६५५३
काथरगांव सौ. वाघ अर्जना अमोल सदस्य ३० स्त्री ना.मा.प्र ९७६४९६५०३२
काथरगांव सौ. आव्हाड रेखा भाउसाहेब सदस्य ०१/०६/१९९० ४० स्त्री सर्वसाधारण ७७५७०२३३७३

लोकसंख्या आकडेवारी


४३७
२५२४
१३३९
११८५
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6